पारनेर ः पारनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. ही ओळख काहीजणांकडून पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. तालुक्यातील काशिनाथ दाते यांच्या सारख्या सुसंस्कृत नेतृत्वाखाली काहीजणांकडून डागळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पारनेर-नगर विधानसभा निवडणुकीने पानेर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे पारनेरमधील वातावरण तणावग्रस्त झालेले आहेत. हा सर्व प्रकार दोन दिवसांपूर्वी उमेदवारांचे फ्लेक्स फाडण्यावरून होत आहे. उमेदवारांचे फ्लेक्स नेमके कोणी फाडले, याचा तपास होणे गरजेचे आहे.
काही विघ्नसंतोषी मंडळी मुद्दा फ्लेक्स फाडून वातावरण तणावग्रस्त करीत आहेत. अशा प्रवृत्तीचा बिमोड होणे गरजेचे आहे. पारनेरमधील दहा उमेदवार उभे असून त्यातील काहीजण पराभव होणार असल्याची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे ते वातावरण दुषीत होण्याच्या दृष्टीने काहीजण प्रयत्न करीत आहेत, अशी चर्चा सध्या पारनेर तालुक्यात सुरु आहे.
विघ्नसंतोषी मंडळींनी सुसंस्कृत नेतृत्व असलेल्या काशिनाथ दाते यांच्या सारख्या नेतृत्वाचे फ्लेक्स बोर्ड फाडलेले आहे. या घटनेचा अनेकांनी निषेध व्यक्त केलेला आहे.
Tags
बेक्रिंग
