अहिल्यानगर ः महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी प्रचाराचा धुराळा सध्या मतदारसंघात उडावला आहे. गावा-गावात घेतल्या जात असलेल्या सभांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. विरोधी गटातील नाराज मंडळी आता दाते गटात दाखल होत असून प्रचाराची धुरा संभाळत आहे.
पारनेर विधानसभा निवडणुकीत या पंचवार्षिक बहुरंगी होत आहे. पारनेरमधील सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहे. सर्वांनीच प्रचाराची राळ उठवलेली आहे. यामध्ये काशिनाथ दाते यांनी पारनेर तालुक्यातील गावा-गावातील प्रचाराचा दोन टप्पे पूर्ण झालेले असून तिसरा टप्पा सुरु झालेला आहे. तिसऱ्या टप्प्यात तर आता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील ४३ गावात आता दाते यांचा प्रचाराचा दौरा सुरु झालेला आहे. या दौऱ्यात दाते यांना विरोधी गटातील नाराज मंडळी येऊन भेट असून प्रचाराच्या कामात सक्रीय सहभाग घेत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नाराजांनी आता आपल्या उमेदवाराचा प्रचाराऐवजी दाते यांच्या प्रचाराची कमान हाती घेतलेली दिसून येत आहे.
नाराज मंडळी दाते सरांच्या गटात दाखल होत आहे. त्यामुळे विरोधक संतापलेले असून आता वाटेल ते आरोप करू लागलेले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण दिसून येत आहे.
Tags
बेक्रिंग
.jpg)