पारनेर ः महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. दाते यांनी पारनेर तालुक्यासह अहिल्यानगर तालुक्यातील गावांमध्ये रॅली काढून मतदारांशी संवाद साधत आहे. काही ठिकाणी ते चौक सभा घेऊन मतदारांच्या अडचणी जाणून घेत आहेत. या चौक सभांना चांगला प्रतिसाद मिळत असून दाते यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे. त्यातच पारनेर तालुक्यातील मतांचे विभाजन झालेले आहे. मतांच्या विभाजनामुळे विजयी कोण होणार याबाबत सध्या पारनेर व अहिल्यानगर तालुक्यात मतांची आकडेमोड सुरु आहे.
या आकडेमोडीत सध्या तरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते आघाडीवर आहेत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्याकडून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झालेले आहेत. मात्र दाते सर यांच्याकडून कोणावर पातळी सोडून टिका केली जात नाही.
दाते सर यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिलेला दिसून येत आहे. या दरम्यान ते गावाृ-गावात चौक सभा घेत आहे. या सभांच्या माध्यमातून ते मतदारांना विकास कामांबाबत माहिती देत आहे. तसेच मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या आगामी काळात सोडविण्याचे आश्वासन देत आहे.
दाते यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात भरीव कामे केलेली आहेत. या कामाच्या बळावर ते आज मतदारांसमोर जात आहे. जिल्हा परिषद सदस्य ते सभापती या काळात त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत. या कामांमुळेच ते पारनेर व अहिल्यानगर तालुक्यात मतांचा जोगवा मागत आहेत. त्यांना मतदारांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
या मुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे ते आता दाते सर यांच्या विरोधात अपप्रचार करत आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील जनता नाराज झालेली असून नाराजांनी काशिनाथ दाते यांचे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Tags
राजकीय
