घराणेशाही थांबविण्यासाठीच निवडणुकीच्या आखाड्यात

राहाता ः आम्हाला आमदरकी मिळवून मिरवायचे नाही. आम्हाला मंत्रीपदासाठी सत्ता बदलायची नाही. आम्हाला आमदारकी ही जनतेच्या कामासाठी मिळवायची आहे. वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाकडे सत्ता राहिल्याने कामे थांबलेली आहे. ती कामे पुन्हा सुरु करण्यासाठी अन् राहात्यातील घराणेशाही संपविण्यासाठी आमदार व्हायचे आहे, असे प्रतिपादन प्रभावतीताई घोगरे यांनी केले


महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा प्रचाराचा झंजावत सध्या राहाता व संगमनेर तालुक्यात सुरु आहे. रोज मतदारांच्या गाठीभेटी त्या घेत असून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तालुक्यात विकास कामे करण्याचे आश्वासन त्या देत आहेत. या वेळी त्यांनी  कोल्हार येथील सभेत डाॅ. सुजय विखे यांनी जो उठतो त्याला आमदार व्हावे वाटते. परंतु आमदार कशासाठी व्हायचे त्यावर कोणीच बोलत नाही. या  वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे.

घोगरे म्हणाल्या की, आपल्याला दक्षिणेतील जनतेने नाकरल्यानंतर आपण सैरभैर झालेला आहात. आमदार होण्यासाठी आपण शिर्डीच प्रयत्न केला. परंतु वडील न थांबल्याने आपण नाईलाजाने संगमनेरमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील मतदारांनी आपल्याला नाकरले आहे. आपल्या घऱात एक आमदार असताना दुसरे आमदारकीचे पद कशाला हवे होते,  असा थेट सवाल घोगरे यांनी या वेळी केला आहे.

घोगरे म्हणाल्या की, आम्हाला आमदार व्हायचे आहे. आम्हाला आमदार झाल्यावर कुटुंब मोठे करायचे नाही, आम्हाला जनतेची कामे करायची आहेत. राहाता तालुक्यात आजोबापासून  ते नातवापर्यंत सर्वांना पदे हवी आहेत. मात्र सर्वसामान्यांना पदे नको आहेत, असे त्या म्हणाल्या.

आमदारकी, खासदराकी, जिल्हा परिषदेचे सदस्यपद असे सर्वच पदे तुमच्या घरात तुमच्याच लोकांना पाहिजे आहेत. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ते फक्त तुम्हाला संतरजा उचालयला लागतात का असा थेट सवाल घोगरे यांनी केलेला आहे.आम्हाला आमदरकीचे पद हे तालुक्याच्या विकासासाठी हवे आहे, असे त्या म्हणाल्या. 

मिरवायसाठी नको आहे. यांना खासदरकीचे पद दक्षिणेतील जनतेने दिले. परंतु त्यांनी त्याच जनतेकडे पाहिले नाही. त्यामुळे या वेळी जनतेने यांना नाकारले आहे. आता उद्योग नसल्याने ते वाटेल तसे बोलून वातावरण गढूळ करीत असल्याची टीकाही घोगरे यांनी सुजय विखे यांचे नाव न घेता केली.

Post a Comment

Previous Post Next Post