अहिल्यानगर ः शिवसैनिकाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पारनेर नगर मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी घेतलेला आहे. हा निर्णय योग्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.
कार्ले यांना नगर तालुक्यासह पारनेर तालुक्यातून शिवसैनिकांसह महाविकास आघाडीसह महायुतीतील नाराज मंडळींकडून पाठिंबा मिळत असल्याने ही निवडणुूक चुरशीची होत असल्याचे दिसून येत आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात शिवसैनिकांची विचार बैठक निमगाव वाघा करून कार्यकर्त्यांशी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी चर्चा केली.
आजही ही सर्व मंडळीं संदेश कार्ले यांच्याबरोबर दिसून येत आहे. सध्या नगर तालुक्यात कार्ले यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. पारनेर तालुक्यातही त्यांच्याकडून प्रचार सुरू असून कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना दिवसागणिक वाढत चालल आहे.
Tags
राजकीय