पारनेरमध्ये मताचे विभाजन कोणाला होणार फायदा

पारनेर : पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात पारनेर तालुक्यातील उमेदवार उभे राहिले आहेत. त्यामुळे मताचे विभाजन होत आहे. त्यामुळे कोन विजयी होणार यावर चर्चेचा खल सुरू झाला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार राणी लंके व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र, आता अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे माजी आमदार विजय भास्कर औटी, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, संदेश कार्ले, मनसेचे अविनाश पवार, अपक्ष भाऊसाहेब खेडेकर हे  निवडणुकीत मोठी रंगत आणणार आहेत.

पारनेर मधील मताचे विभाजन झालेले आहे . त्यामुळे नगर तालुक्यातील मतांना आता महत्व वाढलेले आहे. अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात आणखीन चुरस निर्माण झालेली आहे संदेश कार्ले मोठ्या प्रमाणात नगर तालुक्यातील मतदान घेतील अशी चर्चा सध्या सुरू आहे.

एकाच वेळी पारनेर तालुक्यातून अनेक उमेदवार उभे राहणार आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होत आहे. या विभाजनाचा फायदा निश्चितच इतरांना होणार आहे. त्यामध्ये विजयी होण्याचे दावे करणाऱ्यांचे दावे आता कमी होऊ लागलेले आहेत. आता प्रत्यक्ष मतदार गाठीभेटी सुरु झालेल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post