अहिल्यानगर ः पारनेर विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे. त्यातच पारनेर तालुक्यातील सर्वाधिक उमदेवार असल्याने मतांची विभागणी झालेली आहे. या मतांच्या विभाजनामुळे नगर तालुक्यातील ४३ गावातील मतदानाला महत्व वाढलेले आहे. या मतदानावर आता उमेदवार विजयी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार राणी लंके व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्यात खरी लढत होत आहे. परंतु अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत चुरस वाढलेली आहे.
माजी आमदार विजय भास्कर औटी, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, संदेश कार्ले, मनसेचे अविनाश पवार, अपक्ष भाऊसाहेब खेडेकर हेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहे. या सर्वांमुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे.
संदेश कार्ले वगळता सर्वच उमेदवार पारनेर तालुक्यातील आहेत. या उमेदवारांचा सर्वाधिक संपर्क हा पारनेर तालुक्यातच आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार सर्वाधिक लिड मिळावे, यासाठी पारनेर तालुक्यात लक्ष देत आहेत. याच संधीचा फायदा अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांना होणार आहे. इतरांनीही आपल्यालाच पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
नगर तालुक्यातील ४३ गावात सुमारे एक लाख मतदान आहे. हे मतदान मिळावे, यासाठी आता प्रयत्न सुरु झालेले आहेत. नगर तालुक्यातून अपक्ष म्हणून संदेश कार्ले निवडणूक लढवित आहेत.
हीच बाब आता सर्वांसाठी फायद्याची ठरणार आहे. संदेश कार्ले यांना नगर तालुक्यातून सर्वाधिक लिड मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा विजयी मार्ग सूकर झाला आहे, अशीच चर्चा सध्या पारनेर व नगर तालुक्यात सुरु आहे.
Tags
बेक्रिंग
