अहिल्यानगर ः महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी प्रचाराचा धुराळा सध्या मतदारसंघात उडावला आहे. गावा-गावात घेतल्या जात असलेल्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विरोधी गटातील नाराज मंडळी आता दाते गटात दाखल होत असून प्रचाराची धुरा संभाळत आहे. प्रत्येक गावा-गावातील मतदार काशिनाथ दाते यांन ओळखत असून साथ देण्याचे वचन देत आहे.
पारनेर विधानसभा निवडणुकीत या पंचवार्षिक बहुरंगी होत आहे. पारनेरमधील सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहे. सर्वांनीच प्रचाराची राळ उठवलेली आहे. यामध्ये काशिनाथ दाते यांनी पारनेर तालुक्यातील गावा-गावातील प्रचाराचा तिसरा टप्पाही पूर्ण होत आला आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील ४३ गावाचेही दौरे झालेले आहेत. या दौऱ्यात दाते यांना विरोधी गटातील नाराज मंडळी येऊन भेट असून प्रचाराच्या कामात सक्रीय सहभाग घेत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नाराजांनी आता आपल्या उमेदवाराचा प्रचाराऐवजी दाते यांच्या प्रचाराची कमान हाती घेतलेली दिसून येत आहे.
दाते सर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे केलेली आहेत. तसेच सभापती असताना त्यांचा पारनेर व नगर तालुक्यात चांगला संपर्क आलेला असून या दोन्ही तालुक्यात त्यांनी जिल्हा परिषदेचा मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
तालुक्यात चांगली विकास कामे झालेली आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील गाव व वाड्या-वस्त्यांवरील प्रत्येकजण त्यांना ओळखत आहे. अनेकजण प्रचार दौर्यात त्यांची भेट घेऊन आम्ही साथ तुम्हालाच आहे, असे वचन देत आहे.
Tags
बेक्रिंग
.jpg)