आपला सुसंस्कृतपणा सोडू नका...

पानरेर ः कोणी किती टीका केली तसेच कोणी कितीही फ्लेक्स फाडले तरी कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर देत बसू नये. तसेच त्यावर कोणी वादही घालू नये.  ते जे करत आहेत, त्यातून त्यांचे संस्कार उघड होत आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रचार करताना व भाषणे करताना आपला सुसंस्कृतपणा सोडू नये, असे आवाहन महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी केले.


पारनेर-नगर विधानसभा मतदाराचे महायुतीचे उमदेवार काशिनाथ दाते यांचा पानरेर व अहिल्यानगर तालुक्यात प्रचाराचा झंजावत सुरु आहे. या प्रचाराच्या झंजावामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घरली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सध्या टीकेची झोड उठवली जात आहे. 

काही ठिकाणी दाते यांचे फ्लेक्स फाडण्यात आलेले आहे. ही बाब प्रचारादरम्यान कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी दाते यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्ते व मतदारांना आपला सुसंस्कृतपणा जपण्याचे आवाहन केले.  

दाते म्हणाले, कोण काय करतं, कोण काय बोलतं याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांनी आपले प्रचाराचे काम करीत राहणे गरजेचे आहे. कोणी अंगावर आले तरी लगेच शिंगावर घेत बसून नका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असे ते म्हणाले.

दाते म्हणाले, सुसंस्कृत तालुक्यात आपल्याला सुस्कृतपणेच निवडणुका लढवायच्या असून त्याच पध्दतीने त्या जिंकायच्या आहेत. त्यामुळे कोणीही भाषणातून टीका करू नये. विकास कामावरच प्रत्येकाने बोलावे, असे आवाहन दाते यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post