वास्तविकता पुरुषांपेक्षा आरोग्यपेक्षाही महिलांच्या आरोग्याला जास्त महत्व दिले जाते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे महिलाही घराचा कणा असते. जरी ती गृहिणी असली किंवा नोकरी करणारी स्त्री असो, आजच्या धकाधकीच्या व बदलत्या जीवशैलीमुळे तिला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत घर, मुलांवर संस्कार व कुटुंबाचे आरोग्य या सर्व गोष्टीत महिलांचा वाटा सर्वात मोठा असतो. 21 व्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करीत आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, या सर्वच क्षेत्रात महिलांनी पादाक्रांत केलेली आहे. परंतु या सगळ्यांमध्ये महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. सातत्याने बैठे काम केल्याने व चुकीच्या खाण्याच्या सवयीने त्यांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी वेळे अभावी त्यांच्याकडून पुरेसे प्रयत्न होत नाही. पाश्चात्य संस्कृतीचा व सोशल मीडियाच्या आती आहारी जाणे, तसेच तांत्रिक उपकरणांचा अति वापर करणे या कारणानेच खर तर आजची स्त्री अनेक आजारांना बळी पडत आहे. त्यापैकी सध्या चर्चेत असलेला महिलांविषयीची गंभीर समस्या म्हणजे स्तनांचा कॅन्सर होय. या मध्ये मुख्य कारण म्हणजे, मानसिक ताणतणाव, चिडचिडेपणा, हार्मोनिन्स इन बॅलन्स, थायराॅईड, केसांची गळती, मधुमेह, गर्भाशयाचे कॅन्सर, उच्च रक्तदाब अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्यांसाठी उपाय म्हणजे, जुन ते सोन या म्हणी प्रमाणे स्त्रीने स्वतःची तसेच कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्यायाला हवी. जसे की रोजच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये बदल करून, व्यवस्थित असे स्वतःचे वेळापत्रक बनावून आरोग्याला नक्कीच प्रथम क्रमांक दिला पाहिजे. जुन्या पध्दतीप्रमाणेच स्वयंपाक घरातील पारंपारिक पदार्थांचा व पारंपारिक गोष्टींचा वापर करायला हवा. जसे पितळ, लोखंडीची भांडी आदी. त्याबरोबरच आपली मानसिकता बदलून व समजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरले आहे. मानसिक स्वस्थ्यासाठी एखादा छंद जोपासावा. निदान तीस मिनिट तरी चालावे. तसेच सकस आहारामध्ये पालेभाज्या कडधान्य, फळभाज्या, रंगीत फळे, डाळी, दूध, दुधाचे पदार्थ यांचे सेवन करावे.माधुरी ठोंबरे, आहारतज्ज्ञ
Tags
आरोग्य