कायम हवाय महिलांचा सन्मानमहिला दिन आले की महिलांचा सन्मान सोहळा आयोजित

 


कायम हवाय महिलांचा सन्मानमहिला दिन आले की महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. घर असो की कार्यालय प्रत्येक ठिकाणी महिला दिनी सन्मान केला जातो. परंतु या सन्मानाऐवजी महिलांना आरोग्यबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. कुटुंबातील स्त्रीचे आरोग्य असेल तर संपूर्ण कुटुंबाचे  आपण नेहमी पहातो, सर्वच ठिकाणी महिलांच्या आरोग्य विषयी चर्चा केली जाते. वास्तविकता पुरुषांच्या  रोग्यपेक्षाही महिलांच्या आरोग्याला जास्त महत्व दिले जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महिला ही घराचा कणा असते. ती गृहिणी असो किंवा नोकरी करणारी स्त्री असो, आजच्या धकाधकीच्या व बदलत्या जीवशैलीमुळे तिला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत घर, मुलांवर संस्कार व कुटुंबाचे  आरोग्य या सर्व गोष्टीत महिलांचा वाटा सर्वात मोठा असतो. 21 व्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करीत आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, या सर्वच क्षेत्रात महिलांनी पादाक्रांत केलेली आहे. परंतु या सगळ्यांमध्ये महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. सातत्याने बैठे काम केल्याने व चुकीच्या खाण्याच्या सवयीने त्यांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी वेळे अभावी त्यांच्याकडून पुरेसे प्रयत्न होत नाही. पाश्चात्य संस्कृतीचा व सोशल मीडियाच्या अति आहारी जाणे, तसेच तांत्रिक उपकरणांचा अति वापर करणे, या कारणानेच खर तर आजची स्त्री अनेक आजारांना बळी पडत आहे. त्यापैकी सध्या चर्चेत असलेला व महिलांविषयीची गंभीर समस्या म्हणजे स्तनांचा कॅन्सर होय. या मध्ये मुख्य कारण म्हणजे, मानसिक ताणतणाव, चिडचिडेपणा, हार्मोनल इन बलन्स थायराॅईड, केसांची गळती, मधुमेह, गर्भाशयाचे कॅन्सर, उच्च रक्तदाब अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्यांसाठी उपाय म्हणजे, जुन ते सोन या म्हणी प्रमाणे स्त्रीने स्वतःची तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायाला हवी. जसे की रोजच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये बदल करून, व्यवस्थित असे स्वतःचे वेळापत्रक बनवून आरोग्याला नक्कीच प्रथम क्रमांक दिला पाहिजे. जुन्या पध्दतीप्रमाणेच स्वयंपाक घरातील पारंपारिक पदार्थांचा व पारंपारिक गोष्टींचा वापर करायला हवा. जसे पितळ, लोखंडीची भांडी वापरणे, सूर्यदयापूर्वी उठे व लकवर निजे, सकारात्मक राहणे, स्नायूंचा व्यायाम  होईल असे आवर्जुन करावे जसे लिफ्टचा वापर न करता जिना चढणे-उतरणे, घरातील कामे,बाग कामे स्वतः करावे. त्याबरोबरच आपली मानसिकता बदलून व समजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे  ठरले आहे. मानसिक स्वस्थ्यासाठी एखादा छंद जोपासावा. निदान तीस मिनिट तरी चालावे. तसेच सकस आहारामध्ये पालेभाज्या कडधान्य, फळभाज्या, रंगीत फळे, डाळी, दूध, दुधाचे  पदार्थ यांचे सेवन करावे.मानसिक स्वास्थ्यासाठी एखादा तरी छंद जोपासावा, स्नेह युक्त आणि चरबीयुक्त यांचे सेवन टाळावे.चहा, कॉफी ,गोड पदार्थ यांचा अतिरेक टाळणे, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक पाणी प्यावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी कोणताही फॅन्सी डायट न पाळता तुमची उंची, वजन आणि वय यांचा ताळमेळ साधून योग्य त्या आहार तज्ञांच्या सल्ल्यानेच तुमचं वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

माधुरी ठोंबरे, आहारतज्ज्ञ

Post a Comment

Previous Post Next Post