गडाख-लंघे यांच्यात पारंपारिक लढत होणार...

नेवासा ः माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शनिदेवावर हात ठेऊन शपथ खालली आहे. ही खोटी शपथ खालल्याने त्यांची निवडणुकीत पिछेहाट झालेली आहे. नेवाशाता आता तिरंगी नव्हे तर दुरंगीच लढत होणार आहे. आमदार शंकरराव गडाख व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यात पारंपारिक लढत होत आहे. ही लढत चुरशीची होणार असून आता लंघे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला दिसून येत आहे.


तालुक्यातील ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याच्या निवडणुकीत मुरकुटे यांनी सेटमेंट केल्याचा आरोप झालेला आहे. हा आरोप खोटा असल्याचा दावा मुरकुटे यांनी केला होता. परंतु हा आरोप खरा असल्याचे पुरावे सादर करण्यासही आरोप करणारे तयार आहेत. त्यामुळे मुरकुटे यांनी खोटी शपथ खालली असल्याचा आरोप होत आहे.  या आरोपाव तालुकाभर चर्चा घडत आहेत. 

शपथ प्रकरणामुळे मुरकुटे यांची निवडणुकीतून पिछेहाट झालेली आहे. आता नेवाशात आमदार शंकरराव गडाख विरोधात माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यात लढत होत आहे. ही लढत पारंपारिक असून चुरशीची होणार आहे. या लढतीत सध्या तरी विठ्ठलराव लंघे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post