पारनेर ः निवडणूक म्हटले की एकमेकांवरआरोप प्रत्यारोप होत असतात. विशेष म्हणजे विरोधी उमेदवार समोर येऊ नये, म्हणून पोलिस प्रशासन काळजी घेत असते. परंतु पारनेर तालुक्यात अपक्ष उमेदवार संदेश कार्ले प्रचार करत असताना माजी नगराध्यक्ष विजय औटी यांची भेट झाली. या वेळी औटी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सत्कारानंतर दोन्ही अपक्ष उमेदवार यांची गळाभेट झाली. या गळाभेटीची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
लोकसभेनंतर आता विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकमेकांवर आता चिखलफेक केली जात आहे. राज्यासह देशात ही चिखलफेक सुरु आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिखलफेक सुरु आहे. या चिखलफेकीचा प्रत्यय संगमनेर तालुक्यात आलेला आहे. भाषणातून खालची पातळी गाठल्याने एकास पोलिस स्टेशनची वारी करावी लागलेली आहे.
त्यामुळे राजकारणाकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन बदलेला आहे. आता अनेकजण राजकीय गप्पाच काय बातम्या पाहण्याचे टाळत आहेत राजकारणात मध्यतंरी काही घडलेल्या घटनांचा हा परिणाम आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झालेले आहेत. परंतु पारनेर तालुक्यात एक चांगली घटना घडलेली आहे. पारनेर तालुक्यात अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांचा प्रचार दौरा सुरु होता. या दौऱ्याच्या वेळी ते माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या कार्यालयासमोर जात असतानाच त्यांची व विजय औटी यांची भेट झाली.
या वेळी औटी यांनी कार्ले यांचा सत्कार केला. या सत्कारानंतर औटी व कार्ले यांनी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.आपल्या विरोधकाचा सत्कार करून गळा भेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्याची ही राजकारणातील पहिलीच घटना असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या गळाभेटीची जिल्हयात चांगलीच चर्चा सुरु आहे.
Tags
राजकीय
