अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता. ११) झेंडूची सर्वाधिक आवक झाली होती. फुलामध्ये जिप्सीला सर्वाधिक ६० हजार क्विंटलचा भाव मिळाला.
येथील बाजार समितीच्या आवारात अहिल्यानगर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून फुलांची चांगली आवक
झाली. यामध्ये गुलाब, गुलछडी, गलांडा, झेंडू, पामली, शेवंती, आस्टर, , जरबेरा, स्पिंगर आदी फुलांची आवक झाली. यामध्ये झेंडूची सर्वाधिक आवक १३.०५ क्विंटल झाली होती. झेंडूला कमीत कमी १ हजार ५०० तर जास्तीत जास्त ६ हजार रुपयांचा भाव मिळाला
फुलांचे भाव
गुलाब १२०० ते १५०००
गुलछडी ४००० ते १५०००
गलांडा २००० ते ४०००
झेंडू १५०० ते ६०००
पासली ७५०० ते २१५००
शेवंती २००० ते ५४००
आस्टर ३००० ते १००००
जरबेरा १६००० ते ३२०००
स्प्रिंगर १००० ते १५०००
जिप्सी ३०००० ते ६००००
Tags
कृषी