घेऊ भरारी जिंकणार तुतारी टॅग लाईने पारनेर-नगरमध्ये सर्वाधिक चर्चा

पारनेर ः पारनेर विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. या निवडणुकीत प्रचाराता महाविकास आघाडीच्या उमदेवार राणीताई लंके यांनी आघाडी कायम ठेवलेली आहे. त्यांच्या प्रचारात आता पारनेर व अहिल्यानगर तालुक्यातील कार्यकर्ते व सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. 


गेल्या तीन ते चार दिवसांपासून पारनेर व अहिल्यानगर तालुक्यात घेऊ भरारी.. जिंकणार तुतारी या टॅग लाईनने धुमाकूळ घातलेला आहे. या टॅग लाईनमध्ये काहींनी शरद पवार तर काहींनी खासदार नीलेश लंके तसेच राणीताई लंके यांचा फोटो वापरून हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ही निवडणूक बहुरंगी होत असली तरी विजय तुतारीचाच होणार असल्याचा दावा गावा--गावातील कार्यकर्त्यांसह मतदार करू लागलेले आहे. कोरोना काळात केलेल्या वैद्यकीय मदतीचा फायदा या वेळीही खासदार नीलेश लंके यांना होणार असून राणीताई लंके या आमदार होणार असल्याचे दावा आता कार्यकर्ते करू लागले आहेत. 
घेऊ भरारी... जिंकणार तुतारी ही टॅगलाईन त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर व्हायरल केली जात असून त्यामुळे तुताराची प्रचार अनेकजण करीत असल्याचे यातून दिसून येत आहे. सर्वासमान्यांनी ही निवडणूक हाती घेतल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

Previous Post Next Post